नोंदणी: Sangli Miraj/ RSR/CR/2026/1323 नोंदणी: २०२६/१३२३ स्थापना: १८/०९/२०२६ दुधगाव (सांगली)
Vatvruksha Society Dudhgaon Logo

वटवृक्ष क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., दुधगाव

VATVRUKSHA CREDIT CO-OPERATIVE SOCIETY LTD., DUDHGAON
"स्वप्न तुमचे...सहकार्य आमचे.....सर्वांगीण विकासाचे..वचन वटवृक्षाचे.."
ग्राहक सेवा व मदत ९११९९७७७३१
महत्त्वाच्या सूचना सूचना
★ दामदुप्पट ठेव योजना : अवघ्या ८ वर्षे ९ महिन्यांत रक्कम दुप्पट! ★ ८.१५% आकर्षक व्याजदर : १ वर्ष १ दिवस ते २ वर्षे मुदत ठेव व रिकरिंग ठेवींवर ★ ज्येष्ठ नागरिक सन्मान : १ वर्षांवरील ठेवींवर ०.२५% अतिरिक्त व्याज दर ★ सोनेतारण कर्ज : वैद्यकीय व उच्च शिक्षणासाठी अवघ्या ८.७५% दराने तत्काळ मंजूर! ★ दैनिक पिग्मी ठेव : प्रतिनिधींमार्फत दैनंदिन घरपोच संकलन सेवा सुरू आहे.
वैद्यकीय व उच्च शिक्षणासाठी विशेष सवलत

सोनेतारण कर्ज — अवघ्या ८.७५% व्याजदराने

आणीबाणीच्या वैद्यकीय उपचारांसाठी व पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी कोणत्याही अडथळ्याविना तात्काळ सोनेतारण कर्ज उपलब्ध.

व्याजदर
८.७५%
दरसाल दरशेकडा

सोने तारण कर्ज

वैद्यकीय व उच्च शिक्षणासाठी ८.७५% तर इतर कारणांसाठी ८.९५%. सुरक्षित तिजोरीत सोन्याचे १००% जतन व तात्काळ रोख मंजुरी.

व्याजदर: ८.७५% / ८.९५% | रिबेट: ०.००%

वाहन तारण कर्ज

नवीन दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी ९.९५% आणि जुन्या वाहनांसाठी ११.५०% दराने सुलभ हप्त्यांवर कर्ज उपलब्ध.

व्याजदर: ९.९५% / ११.५०% | रिबेट: ०.५०% पर्यंत

गृह / मालमत्ता तारण कर्ज

घर खरेदी, बांधकाम, नूतनीकरण किंवा व्यापारी मालमत्ता तारण ठेवून १०.४०% ते १०.९०% वाजवी दराने ५ लाख ते १० लाखांपुढील कर्ज.

व्याजदर: १०.४०% ते १०.९०% | रिबेट: ०.२५%

तारण कर्ज

व्यवसाय वाढ, शेती पूरक उद्योग किंवा भांडवलासाठी १० लाखांपर्यंत ११.७५%, १०-१५ लाखांवर ११.२५% व १५ लाखांवर १०.७५%.

व्याजदर: १०.७५% ते ११.७५% | रिबेट: ०.२५% - ०.५०%

विना तारण कर्ज — ₹५०,००० पर्यंत

लहान दुकानदार, शेतमजूर, महिला व गरजूंना कोणत्याही मालमत्ता तारणाविना तातडीच्या गरजेसाठी ₹५०,००० पर्यंत १२.९०% दराने कर्ज.

व्याजदर: १२.९०% | रिबेट: ०.५०%

कर्ज व्याजदर व रिबेट अधिकृत तक्ता

महत्त्वाची नोंद: वाहन कर्ज वगळता इतर सर्व प्रकारच्या कर्जांवर मासिक व्याज आकारले जाणार नाही. त्याऐवजी, वर्षातून एकदाच वार्षिक व्याज आकारले जाईल.
कर्जाचे प्रकार व्याजदर नियमित परतफेडीवर रिबेट
सोने तारण — वैद्यकीय आणि उच्च शिक्षण ८.७५% ०.००%
सोने तारण — इतर कारणांसाठी ८.९५% ०.००%
वाहन तारण — नवीन वाहन कर्ज ९.९५% ०.००%
वाहन तारण — जुने वाहन ११.५०% ०.५०%
तारण कर्ज — १० लाखांपर्यंत ११.७५% ०.५०%
तारण कर्ज — १० लाख ते १५ लाख ११.२५% ०.५०%
तारण कर्ज — १५ लाखांच्या पुढे १०.७५% ०.२५%
गृह कर्ज — ५ लाखांपर्यंत १०.९०% ०.२५%
गृह कर्ज — ५ लाख ते १० लाख १०.६०% ०.२५%
गृह कर्ज — १० लाखांच्या पुढे १०.४०% ०.२५%
विना तारण कर्ज — ₹५०,००० पर्यंत १२.९०% ०.५०%

रिबेट (Rebate) म्हणजे काय आणि ते कसे मिळते?

जे सभासद आपल्या कर्जाचा मासिक हप्ता ठरवून दिलेल्या मुदतीत किंवा वेळेपूर्वी नियमितपणे भरतात, त्यांना संस्थेतर्फे ०.२५% ते ०.४०% पर्यंत व्याजदरात थेट परतावा (सवलत) दिला जातो. यामुळे प्रामाणिक कर्जदारांची व्याजाची रक्कम कमी होते.

कर्ज अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

१. अर्जदाराची ओळख:
आधार कार्ड, पॅन कार्ड व २ फोटो
२. उत्पन्नाचा दाखला / पुरावा:
७/१२ उतारा, पगार स्लिप किंवा बँक स्टेटमेंट
३. मालमत्ता / वाहन पुरावा:
खरेदीखत / ७/१२ / आरसी बुक / कोटेशन
४. दोन जामीनदारांची माहिती:
संस्थेचे सभासद / पत असणारे जामीनदार
कर्जाच्या चौकशीसाठी संपर्क साधा