सर्वसामान्य ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशाला १००% सुरक्षा व संस्थेच्या नेतृत्वाची संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करणारे ५ अभूतपूर्व नियम:
संस्थेच्या चेअरमन पदी असणाऱ्या व्यक्तीस/संचालकास संस्थेतून त्यांनी ठेवलेल्या ठेवी वर ठेवीतारण व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे कर्ज घेता येणार नाही.
संस्थेच्या चेअरमन पदी असणाऱ्या व्यक्तीस संस्थेतून कुठल्याही प्रकारचा भत्ता किंवा आर्थिक लाभ घेता येणार नाही.
एका संचालकांसाठी कमाल कर्ज मर्यादा (सोनेतारण कर्ज व्यतिरिक्त) ₹५ लाख. तसेच सर्व संचालकांची मिळून होणारी एकूण कर्जाची रक्कम ही संस्थेच्या एकूण भाग भांडवलाच्या 15% पेक्षा कमी.
संचालकांना अपवादात्मक परिस्थितीत जर विनातारण कर्ज मंजूर करायचे असेल तर त्यासाठी संचालक मंडळ आणी सल्लागार समिती यांची १००% मान्यता हवी. तसेच संचालकांना दिलेल्या विनातारण कर्जाच्या वसुलीसाठी संस्थेच्या चेअरमन पदी नियुक्त संचालक हे वैयक्तिक पातळीवर जबाबदार असतील.
वाहन कर्ज वगळता इतर सर्व प्रकारच्या कर्जांवर दरमहा चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारले जाणार नाही. त्याऐवजी, वर्षातून केवळ एकदाच सरळ व पारदर्शक पद्धतीने वार्षिक व्याज आकारणी केली जाईल. यामुळे कर्जदारांवर दर महिन्याला व्याजाचा अतिरिक्त ताण पडत नाही आणि हिशेब समजणे अत्यंत सोपे होते. शेतकरी, व्यावसायिक व सामान्य खातेदारांना आपली आर्थिक नियोजनबद्धता राखण्यास यामुळे मोठा आधार मिळतो.
वटवृक्ष सोसायटीमधील तुमचा प्रत्येक रुपया या ३ मजबूत स्तंभांमुळे १००% सुरक्षित व हमीशीर राहतो
हिशोबाची पारदर्शकता, काटेकोर अंतर्गत तपासणी आणि सहकार कायद्यानुसार अचूक आर्थिक नियोजन.
प्रतिष्ठित कायदेतज्ज्ञ, बँकर्स व विचारवंतांची समिती; ज्यांच्या १००% मान्यतेशिवाय मोठा आर्थिक निर्णय अशक्य.
संचालक कर्जाच्या वसुलीसाठी केवळ संस्था नाही, तर संपूर्ण संचालक मंडळ व चेअरमन स्वतः वैयक्तिक जबाबदार.